नवीन वर्षानिमित्त राज्यातील ५० दिव्यांगांनी केले कळसुबाई शिखर सर

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : राज्यातील ५० दिव्यांगांनी एकत्र येत महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे ५४०० फुटाचे सर्वोच कळसुबाई शिखर सर करून नवीन वर्षाचा अनोखा थर्टी फरटं साजरा केला आहे.

शिवुर्जा प्रतिष्ठान या दिव्यांगांच्या दुर्ग भ्रमण संवर्धन संस्थेच्या वतीने गेल्या १४ वर्षापासून सर्वात उंच कळसुबाई शिखरावर दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील ३१ डिसेंबर रोजी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, बुलढाणा, सातारा, जळगाव, अकोला, हिंगोली, अमराती, धुळे, लातूर या जिल्ह्यातील ५० पेक्षा जास्त दिव्यांग आणि त्यांचे मदतनीस कळसुबाई शिखर पायथ्याच्या बारी गावात एकत्र जमा झाले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली व सचिव कचरू चांभारे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी एक वाजता कळसुबाई शिखर चढण्यास सुरुवात केली. 

खाचखळगे, अवघड वाटा, झाडी झुडपे, डोंगरदऱ्या, लोखंडी शिड्चा, निसरड्या वाटेवर एकमेकांच्या हाताला धरून या सर्व दिव्यांगांनी अवघ्या पाच तासात कळसुबाई शिखर सर केले. ३१ डिसेंबर रात्रीचा मुक्काम कडाक्याच्या थंडीत आणि सोसाट्याच्या वाऱ्यात कळसुबाई शिखर माथ्यावर कापडी तंबूत ठोकण्यात आला होता. एक जानेवारी नवीन वर्षाचा सूर्योदय सवों च शिखरावरून पाहून जल्लोष साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी एक जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शिखर उतरण्यास सुरुवात केली आणि अवध्या तीन तासात हे सर्व दिव्यांग सुखरूप पायध्याच्या बारी गांवात पोहोचले. कळसुबाई शिखर पायथ्याला असलेल्या बारी आणि जहागीरदारवाडी या गावातील गावकऱ्यांनी या सर्व कळसुबाई शिखर वीर दिव्यांगांचे स्वागत केले,

बारी गावचे सरपंच वैशाली खाडे, उपसरपंच गणेश खाडे, सदस्य रोहिणी खाडे, जहागीरदारवाडी गावचे सरपंच पंढरीनाथ खाडे, उपसरपंच रुक्मिणी कस्टुले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे व सचिव कचरू चांभारे यांच्या हस्ते सर्व दिव्यांगांचा व त्यांच्या मदतनिसांचा सत्कार प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

 सहभागी सदस्य शिवाजी गाडे अध्यक्ष, कचरू चांभारे सचिव, जगन्नाथ चौरे, मच्छिंद्र थोरात, जीवन टोपे, सागर बोडके, कल्याण घोलप, विजय पाटील, अतुल कदम, अवधूत लाळे, जालिंदर
दिवेकर, तेजस्वी कदम, किरण जाधव, सुनील वेदपाठक, प्रियंका लाड, दतु बखळे, भास्कर शिंदे, गणेश सुकाळे, रामराज गिरी, संभाजी जाधव, गणेश अत्तरकार, रंजना शेवाळे, मदन बर्वे, नामदेव फरडे, अरुण गायधरे, श्रीदत बिरादार, आबा थोरात, शंकर पवार पंकज डुकरे, हनुमंत बाबर, यश खोपडे, प्रशांत विपिनकर, अरुण गायकवाड, संगीता शेवाळे, योगेश जाधव, मुकुंद आहेर, गहिनीनाथ मिसे, सतीश आणेराव, राजू जाधव, लक्ष्मीकांत शिरूरकर, प्रमोद अंदुरे, शरद मायके दत्तात्रय प्रभाळे, बाजीराव ढाकणे अलोक पवार, श्रावणी सावंत, संजय अलमुले, राजू खोपडे, अमर कदम, तेजल कदम आदींचा समावेश होता.